बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचे पालकमंत्री पद सोडले, इंद्रनील नाईक नवीन पालकमंत्री

नाशिक आणि रायगड जिह्यातील पालकमंत्री पदाचा वाद कायम आहे. पालकमंत्री पद मिळवण्यासाठी स्पर्धा लागलेली असताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदिया जिह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आता राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे गोंदियाचे पालकमंत्री पद सोपवण्यात आले आहे.

महायुती सरकारमध्ये एका जिह्यातील आमदाराला लांबच्या जिह्यात पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे झेंडावंदनासाठी काही पालकमंत्री दूरच्या जिह्यात जाण्यास उत्सुक नसतात. स्वतःचा जिल्हा सोडून दुसऱया जिह्यात जाऊन काम करण्यास काही पालकमंत्री तयार नसतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी पक्षाच्या शिबिरात बोलताना नेमक्या याच मुद्दय़ावर बोट ठेवले होते. कारण लातूर जिह्यातल्या अहमदपूरचे प्रतिनिधित्व करणारे बाबासाहेब पाटील हे गोंदिया जिह्याचे पालकमंत्री पद नको होते. त्यातच त्यांनी अचानक गोंदिया जिह्याच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहे.