
ऐन दिवाळीत आयआरसीटीसीची वेबसाईट आणि मोबाईल अॅप बंद पडले. शुक्रवारी सकाळी 9 वाजेपासून प्रवाशांना या वेबसाईटवरून रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी अडचणी आल्या. प्रवाशांना समस्या उद्भवल्याने जवळपास 6 हजारांहून अधिक लोकांनी सोशल मीडियावर याच्या तक्रारी केल्या. आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही समस्या तांत्रिक कारणामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे तिकीट काढण्यात अडचणी येत आहेत. ही समस्या लवकरात लवकर दूर केली जाईल.
आयआरसीटीसीवर एसी क्लाससाठी तत्काळ तिकिटांची बुकिंग वेळ सकाळी 10 वाजता आहे, तर स्लीपर क्लाससाठी तत्काळ तिकिटांची बुकिंग वेळ सकाळी 11 वाजता आहे. आयआरसीटीसीचे तिकिट बुकिंग प्लॅटफॉर्म तत्काळ बुकिंग सुरू होण्यापूर्वीच बंद पडले. आज धनत्रयोदशीसाठी तत्काळ कोटा बुकिंग नियोजित होते. यामुळे लोकांना मोठी गैरसोय झाली. प्रवाशांना तत्काळ तिकिटपासून वंचित राहावे लागले.