
लोअर परळ येथील नारायण मिल गल्लीमध्ये यंदाही मराठी संस्कृतीची ओळख असलेली भव्य ‘दिवाळी पहाट’ संपन्न होणार आहे. तब्बल 65 वर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेत समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संकल्प कायम आहे. शनिवारपासून या उत्सवाला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी भव्य साई पालखी मिरवणूक सोहळा पार पडला. या दीपोत्सवाचा सांगता सोहळा 26 ऑक्टोबरला होणार आहे.
दिवाळी पहाट उत्सव 20 ऑक्टोबर रोजी पहाटे 6 वाजता रंगणार आहे. स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमुळे गल्लीतील कला आणि संस्कृतीला विशेष उजाळा मिळणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी फॅन्सी ड्रेस गरबा होणार आहे. 21 ऑक्टोबरला लहान तसेच खुली चित्रकला स्पर्धा होणार आहे. या उत्सवात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अरुण पालव, सचिव प्रदीप बांदेकर तसेच खजिनदार प्रथमेश राणे यांनी केले आहे.