मुंबई पोलिसांची नागरिकांना दिवाळी भेट, साडेसहा कोटींचा ऐवज केला परत

मुंबई पोलिसांनी शेकडो नागरिकांना दिवाळीची भेट देऊ केली आहे. शेकडो नागरिकांचा गहाळ तसेच चोरीला गेलेला किमती ऐवज शोधून आज त्यांना परत करण्यात आला. ऐन दिवाळीत आपला ऐवज परत मिळाल्याने नागरिकांना सुखद धक्का बसला आहे.

आज पश्चिम प्रादेशिक विभागातील जवळपास 678 नागरिकांना त्यांची रोख रक्कम, वाहने, किमती घडय़ाळे, मोबाईल, सोन्याचे दागिने आदी मौल्यवान वस्तू परत करण्याचे काम पोलिसांनी केले. तब्बल सहा कोटी 45 लाख 89 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकांना परत केला.

800 मोबाईल मूळ मालकांना स्वाधीन

मुंबई पोलिसांच्या पूर्व प्रादेशिक विभागाकडून आज 800 मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.