
नागपूर, अमरावती, पुणे, नाशिक, कोकण विभागातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 3 हजार 258 कोटी 56 लाख 47 हजारांचा निधी वितरित करण्यास राज्याच्या महसूल व वन विभागाने आज मंजुरी दिली आहे. यामध्ये कोकण विभागातील एक लाख पाच हजार 239 शेतकऱयांच्या 29 हजार 233.16 हेक्टर क्षेत्रासाठी 28 कोटी 10 लाख 63 हजार रुपये निधी देण्यात आला आहे.