डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध अमेरिकेत आंदोलन पेटलं, ‘नो किंग्ज’ निदर्शनात हजारो लोक रस्त्यावर उतरले

रविवारी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात सर्वात मोठे निदर्शने झाली. देशभरातील विविध शहरांमध्ये २,६०० हून अधिक रॅली काढण्यात आल्या. या रॅलींमध्ये जवळपास ७० लाख लोक सहभागी झाले होते. या निदर्शनांना ‘नो किंग्ज” असे नाव देण्यात आले आहे.

ट्रम्पच्या राजवटीत देश वेगाने हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याचा आरोप निदर्शकांनी केला आहे. यापूर्वी जूनमध्ये झालेल्या पहिल्या ‘नो किंग्ज’ निदर्शनांमध्ये अंदाजे २,१०० ठिकाणी रॅली काढण्यात आल्या होत्या.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध न्यू यॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर, बोस्टन, अटलांटा आणि शिकागोमधील उद्यानांमध्ये मोठा जनसमुदाय जमला होता. वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस आणि रिपब्लिकन-वर्चस्व असलेल्या अनेक राज्यांमध्येही लोक रस्त्यावर उतरले. रिपब्लिकन पक्षाने या निदर्शनांना ‘हेट अमेरिका रॅलीज’ असे नाव दिले.