चॅटजीपीटीला टक्कर देणार स्वदेशी ‘सर्वम एआय’

हिंदुस्थानचे स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल ‘सर्वम एआय’चे लवकरच आगमन होणार आहे. हे एआय मॉडेल डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 पर्यंत तयार होईल. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, त्यांनी हेदेखील स्पष्ट केले आहे की ते स्वतः ‘सर्वम एआय’चा वापर सुरू करणार आहेत.

‘सर्वम एआय’ने गेल्या वर्षी ऑगस्ट 2024 मध्ये एक सॉफ्टवेअर सादर केले होते, जे कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांशी केवळ मजकूरऐवजी बोलून संवाद साधण्याची सुविधा देते. विशेष म्हणजे, या तंत्रज्ञानाला हिंदुस्थानातील 10 स्थानिक भाषांमधील डेटावर प्रशिक्षित करण्यात आले आहे, ज्यामुळे हे अनेक प्रादेशिक भाषांना सपोर्ट करते. त्यामुळे वापरकर्ते आपापल्या भाषेत बोलून संवाद साधू शकतील. सध्या बाजारात असलेल्या चॅटजीपीटी आणि जेमिनी यासारख्या ‘एआय’ चॅटबॉट्सपेक्षा ‘सर्वम एआय’ स्थानिक भाषांमध्ये वापरता येत असल्याने अधिक उपयुक्त ठरू शकते.