दिल्ली-एनसीआरची हवा बिघडली

दिल्ली-एनसीआर भागात वायू प्रदूषणाची पातळी धोकादायक झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार गुरुग्राम, नोएडा आणि गाझियाबाद या शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांकाने 300 चा टप्पा ओलांडला, हा श्वसनासाठी घातक आहे. दिल्लीतही अनेक भागांतील एक्यूआय खराब आहे. वायू प्रदूषणाची वाढती तीव्रता लक्षात घेता नोएडा आणि गाझियाबादमध्ये प्रदूषण निर्मूलनासाठी श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजना (ग्रेप-1) लागू करण्यात आली आहे. दिल्लीतही हे नियम लागू आहेत.