
पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले युद्ध तत्काळ थांबले आहे. कतार आणि तुर्कीच्या यशस्वी मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला आहे.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात अधिपृत निवेदन काढले आहे. शस्त्रसंधीची योग्य अंमलबजावणी व्हावी व ही शांतता कायम राहावी यासाठी दोन्ही देशांनी पुढील काही दिवस बैठका घेण्याचे मान्य केल्याचेही कतारने म्हटले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर दहशतवादी कारवायांचे आरोप केले आहेत. त्यातून हा संघर्ष सुरू झाला होता.