Beed news – आरक्षण रद्द होण्याच्या भीतीने मराठा युवकाची आत्महत्या

मराठा समाजाला मिळालेले कुणबी आरक्षण रद्द होईल की काय, या भीतीने बीड तालुक्यातील वरवटी येथील एका 23 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विष्णू (श्याम) परमेश्वर कोटुळे असे या युवकाचे नाव आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना त्याच्या खिशात सापडली आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, मराठा समाजाला कुणबी म्हणून शासनाने जीआर काढला होता. परंतु परवा बीडला झालेल्या ओबीसीच्या महाएल्गार मेळाव्यामुळे मराठा समाजाला दिलेला जीआर रद्द होणार व पुन्हा आम्हाला नोकरी मिळणार नाही, या नैराश्यातून मी आज आत्महत्या करत आहे. माझा मराठा समाज खूप गरीब आहे. मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकले नाही तर माझ्यासारखे अनेक मराठा बांधव आत्महत्या करतील, असेही त्याने या चिठ्ठीत लिहिले आहे.