चेहऱ्यावर मध लावण्याचे काय फायदे होतात, जाणून घ्या

त्वचेसाठी मध हा वरदानापेक्षा कमी नाही. तुम्हाला चमकदार त्वचा मिळवायची असेल, तर तुम्ही मधाला तुमच्या ब्युटी रुटीनचा एक भाग बनवू शकता. मधामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, दाहक-विरोधी आणि HUMECTANT गुणधर्म असताे. यामुळे त्वचेवर साचलेली घाण काढून टाकण्यास मदत करते. मुरुम आणि त्वचेची जळजळ प्रतिबंधित करते, मुख्य म्हणजे मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील आहेत.

त्वचेला उजळपणा येण्यासाठी ‘या’ तेलाचा वापर करुन बघा, वाचा

सूर्यप्रकाशापासून ते आपल्या निस्तेज त्वचेपर्यंतच्या अनेक समस्यांवर मध फायदेशीर आहे. तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये ते समाविष्ट करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे ते फेशियल म्हणून वापरणे. तुमच्या त्वचेसाठी फेशियल हा एक उत्तम उपाय आहे. तुम्ही घरच्या घरी मधाचे फेशियल देखील करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

घरच्या घरी मधाचे फेशियल करताना सर्वात आधी चेहरा आणि मानेवर मध लावावे. किमान 20 मिनिटे मध लावून तसाच चेहरा सुकवावा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवावा.

शांत झोप लागण्यासाठी महिन्यातून एकदा हे करायलाच हवं, वाचा

मधामुळे त्वचेची उघडी छिद्रे बंद करून त्वचा स्वच्छ होते. मधापासून आपण चांगला टोनरही तयार करु शकतो. प्रथम तुम्ही काकडी आणि मध घ्या. काकडी सोलून प्युरी बनवा.

काकडीच्या रसात मध मिसळा. मिश्रण एका बाटलीत घाला आणि चांगले मिसळा.

कॉटन पॅडच्या मदतीने हे फेशियल टोनर संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा.

घरी दही वडा करताना या टिप्स न विसरता लक्षात ठेवा, वाचा

मधामध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेसाठी उत्कृष्ट एक्सफोलिएटर बनवतात. हे तुमच्या त्वचेचे छिद्र खोलवर साफ करण्यास मदत करते आणि ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स सारख्या समस्यांना प्रतिबंधित करते.

एका भांड्यात मध आणि पिठीसाखर टाकून नीट मिसळा.
आपला चेहरा ओला करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा.
हळुवारपणे आपला चेहरा आणि मान मालिश करा.
5-10 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर साध्या पाण्याने धुवा.