
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा आयएनएस ‘विक्रांत’वर तैनात असलेल्या नौदलाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. वीर जवानांच्या सोबत दिवाळी साजरी करता येणे ही भाग्याची गोष्ट आहे, असे मोदी या वेळी म्हणाले.
नौदलाच्या जवानांना संबोधित करताना मोदींनी आयएनएस विक्रांतच्या पराक्रमाचेही काwतुक केले. आयएनएस विक्रांत हे आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी विक्रांतने पाकिस्तानची झोप उडवली. या ऑपरेशनच्या वेळी सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये उत्तम समन्वय होता. ‘विक्रांत’च्या धसक्याने शत्रूने काही दिवसांतच गुडघे टेकले, असे मोदी म्हणाले.
हिंदुस्थान नक्षलमुक्तीच्या उंबरठ्यांवर
मोदींनी या वेळी देशातील पोलीस दलाचेही काwतुक केले. पोलिसांनी आजवर नक्षलवाद्यांचा ज्या धैर्याने सामना केला, त्याला तोड नाही. अनेक पोलिसांनी नक्षलवाद्यांशी लढताना आपले हात-पाय गमावले. मात्र ते मनाने खचले नाहीत. हिंदुस्थान आता माओवादी हिंसाचारापासून मुक्त होण्याच्या उंबरठय़ावर आहे. 90 टक्के यश मिळाले आहे. लवकरच माओवाद्यांचा पुरता बीमोड होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.