केस मऊ आणि दाट करण्यासाठी, हे करून पहा

केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. केसांना नियमितपणे नारळ, आवळा किंवा एरंडेल तेलासारख्या तेलांनी मालिश करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केस मजबूत होतात. केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. गरम पाणी टाळा. कारण ते केसांमधील नैसर्गिक तेल काढून टाकते.

n कोरफडीमध्ये असलेले पोषक घटक केसांना मॉइश्चराइझ करतात आणि त्यांची वाढ सुधारतात. मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी पेस्ट बनवून केसांवर लावा. यामुळे केसांची वाढ सुधारते. आपल्या आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश करा. यामुळे केस आतून मजबूत होतात. तणावामुळे केसगळती वाढू शकते.