फोटो- शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्यातर्फे कांजूर रिक्षा मालक चालकांना दिवाळी भेट

शिवसेना आमदार आणि कांजूर रिक्षा चालक-मालक युनियनचे अध्यक्ष सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कांजूर रिक्षा मालक चालकांना दिवाळी भेट देण्यात आली. या वेळी कांजूर रिक्षा मालक-चालक संघटनेचे उपाध्यक्ष, कणकवली संपर्कप्रमुख राजेश पावसकर, शाखाप्रमुख रवींद्र महाडिक, विक्रोळी विधानसभा संघटक श्वेता पावसकर, योगेश पेडणेकर, लीना मांडलेकर, विलास मोरे, वैभव मोरे, दीपक जाधव, संतोष महादेव, दीपक खेडेकर, सत्यवान सावंत, राजू शेटे, रॉबीन, संदीप मोरे, मिलिंद खानविलकर, सत्यवान सावंत, प्रतीक पावसकर, गणेश पिचुरले उपस्थित होते.