सोलापुरातील सुलतानपुरात 1 रुपयाही पोहोचला नाही

अतिवृष्टीमुळे सीना नदीला आलेल्या महापुराचा सर्वात जास्त फटका सोलापूरमधील राहुल नगर अर्थात सुलतानपूर या गावाला बसला होता. संपूर्ण गाव पाण्याखाली जाऊनदेखील दिवाळी संपत आली तरी मदतीचा एक रुपयाही गावकऱ्यांना मिळाला नसल्याची कैफियत ग्रामस्थ दत्तात्रय शिंदे यांनी मांडली आहे. शिंदे यांचे  घर पाण्याखाली होते, मात्र लाखोंचे नुकसान होऊनही अद्याप मदतीचा एक रुपयाही त्यांना मिळाला नाही.

मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेल्या दारफळ गावातही मदत नाही

महापुराने दणका दिलेल्या माढा तालुक्याच्या दारफळ या गावी खरे तर मुख्यमंत्र्यांनी भेट दिली होती. ज्या ठिकाणी 126 लोक अडकले आणि त्यांच्यासाठी हेलिकॉप्टर बोलवायची वेळ आली तीच ही बोराटे वस्ती. घरावर तीस फूट पाणी असलेल्या येथील अनेक लोकांना अद्याप शासनाची कसलीही मदत मिळालेली नाही.