
सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. सर्वकाही डिजिटल असल्याने फोनमध्ये भरमसाट अॅप्स असतात. त्यामुळे फोनची बॅटरी लवकर संपते. बऱ्याचदा नवीन फोन खरेदी केल्यानंतर काही दिवसांनंतर फोनची चार्जिंग फास्ट होत नाही. अत्यंत हळू आणि कमी वेगाने होते. जर तुमच्या फोनच्या बाबतीत हे होत असेल तर जाणून घ्या.
सर्वात आधी फोनची चार्जिंग केबल आणि चार्जर तपासा. कधी कधी खराब झालेल्या केबल आणि चार्जरमुळे फोनचे चार्जिंग कमी होत असते. त्यामुळे हे तपासणे गरजेचे आहे. फोनमधील बॅकग्राऊंड अॅप्स बंद करा. अनावश्यक अॅप्स बंद केल्याने बॅटरी लवकर चार्ज होईल. अनावश्यक फिचर्सही बंद करा. ब्लूटूथ, वायफाय आणि लोकेशन बंद ठेवा.
फोनला थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. यामुळे फोनची चार्जिंग कमी होऊ शकते. अधून मधून फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करा. चार्जिंग पोर्टमधील धूळ किंवा कचरा स्वच्छ करा.


























































