
आपल्या आरोग्यासाठी सुकामेवा हा खूप गरजेचा मानला जातो. सुका मेवा म्हणजे प्रथिनांचे भंडार.. बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता आणि मनुका यांसारख्या सुक्या मेव्यात प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. सुका मेवा खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. तसेच आपल्या मेंदूची कार्यक्षमताही वाढते. म्हणूनच आपल्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सुकामेवा हा खूप गरजेचा आहे.
अक्रोड आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दररोज 2 आठवडे सतत 2 अक्रोड खाल्ले तर शरीरावर आणि मनावर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. तर चला त्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया.
अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला ओलावा आणि पोषण देतात. यामुळे त्वचा चमकदार होते आणि सुरकुत्या येण्यापासून बचाव होतो. तसेच केसांच्या मुळांसाठी खूप उपयुक्त मानले जाते.
अक्रोडमध्ये कॅलरीज जास्त असले तरी ते पोट बराच वेळ भरलेले ठेवतात. त्यामध्ये असलेले फायबर आणि निरोगी चरबी भूक नियंत्रित करण्यास आणि जास्त प्रमाणात खाणे कमी करण्यास मदत करतात, त्यामुळे वजन नियंत्रित करण्यास आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.
आपल्या आहारात उडदाची डाळ समाविष्ट करण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या
तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत 15 दिवस 2 अक्रोड खाल्ले तर ते हृदय, मेंदू, पचन आणि त्वचेसाठी वरदान ठरू शकते. परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळला पाहिजे. कोणताही आहार हा प्रमाणात असेल तरच, आपले आरोग्य उत्तम राहील.
दररोज 2 अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती, एकाग्रता आणि विचार करण्याची क्षमता सुधारते. अक्रोडला “ब्रेन फूड” असेही म्हणतात. त्यामध्ये असलेले पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात. म्हणून दररोज किमान दोन अक्रोड खाणे हे खूप गरजेचे आहे.
अक्रोडमध्ये भरपूर फायबर असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते आणि आतडे स्वच्छ करण्यास मदत करते. नियमित सेवनाने पोट हलके होते आणि पचनक्रिया चांगली होते, त्यामुळे एकूण आरोग्य सुधारते. तुमची पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी तुमच्या आहारात हे समाविष्ट करणे हा एक चांगला पर्याय आहे.
कोलेस्टेरॉलचा त्रास असेल तर अक्रोड खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे प्रमाण चांगले असते, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. हे वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक सारख्या आजारांचा धोका कमी होतो.




























































