महत्त्वाचे – आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. अजय चंदनवाले

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयूएचएस) कुलगुरूपदाचा अतिरिक्त प्रभार राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्याकडे आज सोपवला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांचा कार्यकाळ संपल्याने राज्यपालांनी हा निर्णय घेतला.

8 फेब्रुवारीला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सीटीईटी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेची (सीटीईटी) घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार 8 फेब्रुवारी रोजी ही परीक्षा देशभरातील 132 शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. 8 फेब्रुवारी रोजी होणाऱया सीटीईटीमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 चा समावेश असणार आहे. एकूण 20 भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेबाबतच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी https://ctet.nic.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.