
अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे भक्ष्याचा पाठलाग करत असताना एक बिबट्या रात्रीच्या अंधारात विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला.
पिंपळगाव निपाणी शिवारात संपत उघडे यांच्या विहिरीत हा बिबट्या मृतावस्थेत रविवार सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास वैभव पवार या तरुणास आढळून आला. हा बिबट्या दोन दिवसां पूर्वी भक्ष्याचा पाठलाग करत असताना मध्यरात्रीच्या वेळी विहिरीत पडला. विहिरीला सुरक्षा कठडे नसल्याने बिबट्या अंधारात खोल विहिरीत पडला.. त्याला बाहेर येण्यासाठी काहीही मार्ग दिसला नसल्याने त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, कुत्रे बिबट्याने फस्त केले आहेत. दिवसा ढवळ्या बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी लाईट असतानाही लोक घरा बाहेर पडत नाहीत असे ग्रामस्थांनी सांगितले.



























































