
वर्षभरापूर्वीच हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी आणि लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून आर्यनची अनाया बांगर झाली. अनायाने घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे ती चर्चेत आहे. आता तिने पुन्हा एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने पूर्वीसारखे आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. तिला आधीपासूनच क्रिकेटची आवड असल्यामुळे शस्त्रक्रियेनंतर अनाया पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे.
अनायाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आधी राइज अॅण्ड फॉल या रिअॅलिटी शोमध्ये मिळालेल्या सपोर्टवर चाहत्यांचे आभार मानले आहेत. राइज अॅण्ड फॉल या शो मध्ये तुम्ही सर्वांनी केलेल्या सपोर्ट आणि दिलेल्या भरपूर प्रेमासाठी तुमचे आभार. माझ्या शस्त्रक्रियेला आता 3 महिने पूर्ण झाले आहेत आणि मी आता एकदम ठीक आहे. त्यामुळे मी आसा निर्णय घेतलाय की मी आता क्रिकेट फिल्डवर पुन्हा उतरणार आहे. या वेळी मी आर्यन म्हणून नाही तर अनाया म्हणून खेळणार आहे. माझा हा प्रवास आता पुन्हा सुरू होणार आहे त्यामुळे, Stay tuned… असे तिने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन आता अनाया नावाने ओळखली जाते. यापूर्वी आर्यन फिरकी गोलंदाज होता. अंडरएज क्रिकेट टूर्नामेंटमध्ये आर्यन बांगरने सरफराज खान, यशस्वी जैसवाल यांसरख्या क्रिकेटरसोबत खेळला आहे. क्रिकेटचे प्रचंड वेड असणारा आर्यन आता अनाया बनून क्रिकेटच्या मैदानात काय धुमाकूळ घालेल हे पाहणे चाहत्यांसाठी उत्सुकतेचे असेल.
लग्न न करता अनायाला व्हायचंय आई… एका रील व्हिडीओतून दिली कबूली

























































