
शिवसेनाप्रणीत शिव विधी व न्याय सेना महाराष्ट्र राज्यचा तिसरा वर्धापन दिन सोहळा 28 ऑक्टोबर रोजी शिवसेना भवन येथे होणार आहे. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत होणाऱ्या या सोहळ्याप्रसंगी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर व ‘शिव विधी दर्पण – समाज आणि न्यायाचे प्रतिबिंब’ या वार्षिक मासिकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
शिव विधी व न्याय सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते – खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अॅड. अनिल परब, उपनेते नितीन नांदगावकर, माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते, सचिव पराग डाके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक संघटनेचे अध्यक्ष अॅड. नितीश सोनवणे व उपाध्यक्षा अॅड. सुरेखा गायकवाड आहेत. या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने वकील व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.






























































