
सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या ‘सूर्योदय फाऊंडेशन’च्या वतीने पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयाच्या ‘एनआयसीयू’ रुग्णालयाला प्रिमॅच्युअर मुलांसाठी निओनेटल व्हेंटिलेटर देण्यात आला आहे. यामुळे मुंबईभरातून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे. आज पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हेंटिलेटरचे लोकार्पण करण्यात आले.
गायिका अनुराधा पौडवाल यांच्या माध्यमातून सूर्योदय फाऊंडेशन आरोग्यसेवा, जलसंवर्धन आणि ग्रामीण महाराष्ट्रातील शाळांच्या पुनर्बांधणीसारख्या सामाजिक क्षेत्रांमध्ये काम करीत आहे. याच पार्श्वभूमीवर आता केईएम रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाला हायब्रिड निओनेटल व्हेंटिलेटर भेट म्हणून देण्यात आले आहे. यावेळी डीन
डॉ. संगीता रावत आणि इतर वरिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते.
असा होणार फायदा…
ही सुविधा 500 ग्रॅमपेक्षा कमी वजनाच्या अकाली जन्मलेल्या बालकांच्या काळजीसाठी वापरली जाते, जोपर्यंत त्यांचे वजन सामान्य होत नाही आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येत नाही. अकाली जन्मलेल्या (प्रिमॅच्युअर) बालकांच्या श्वसनाचा त्रास होऊ नये म्हणून या व्हेंटीलेटरचा वापर होणार आहे.






























































