
टॅरिफ बॉम्बमुळे हिंदुस्थान-अमेरिकेचे संबंध ताणलेले असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काwतुक केले. ‘नरेंद्र मोदी हे खूप छान, रुबाबदार व्यक्ती आहेत, किलर आहेत, असे ट्रम्प म्हणाले. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’ मीच थांबवले असा दावाही ट्रम्प यांनी केला.
‘आसियान’ शिखर परिषदेला संबोधित करताना ट्रम्प बोलत होते. हिंदुस्थान, पाकिस्तान या दोन्ही देशांचे पंतप्रधान खूप चांगली माणसे आहेत. त्यांच्याशी माझे उत्तम संबंध आहेत. पण ते दोघेही एकमेकांशी भांडत होते. त्यांना थांबवण्यासाठी मी व्यापार थांबवण्याची धमकी दिली. सुरुवातीला त्यांनी आढेवेढे घेतले मात्र नंतर मान्य केले, असे ट्रम्प म्हणाले. ’ज्यो बायडेन यांना हे जमले नसते, असे म्हणत अमेरिकेतील विरोधी पक्षालाही त्यांनी टोला हाणला.





























































