
कागदाच्या असंख्य घड्यांमधून साकारलेल्या अनेकविध कलाकृती, कागदातून साकारलेले अष्टविनायक, विविध प्रकारची कागदी फुले, कलाकृती, प्राणी, पक्षी पाहण्याची संधी पुणेकरांना आजपासून उपलब्ध झाली आहे. इंदुताई टिळक कला केंद्र व ओरिगामी मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले ‘वंडरफोल्ड २०२५’ ओरिगामी कला प्रदर्शन आहे. सदर प्रदर्शनाला आजपासून टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे सुरुवात झाली. हे वर्ष या प्रदर्शनाचे १८ वे वर्ष असून रविवार दि. २ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
सर्व फोटो – चंद्रकांत पालकर






























































