सीबीएसई दहावी, बारावी परीक्षा 17 फेब्रुवारीपासून

सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक 110 दिवस आधी जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार 17 फेब्रुवारी 2026 पासून या परीक्षा सुरू होणार आहेत. गेल्याच महिन्यात संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. सीबीएसई बोर्डाच्या cbse.gov.in या संकेतस्थळावर  परीक्षेचे वेळापत्रक पाहता येईल.  नियोजित वेळापत्रकानुसार सीबीएसई दहावीची परीक्षा यंदा 17 फेब्रुवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीत पार पडणार आहे,  तर बारावीची परीक्षा 17 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत होणार आहे.