
कोर्टाच्या आदेशाकडे दुर्लक्ष तसेच नोटीस घेण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी वॉरंट बजावण्यात आलेल्या राज्याच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी न्यायालयात बिनशर्त माफीनामा सादर करत सुनावणीला हजर राहण्याची हमी दिली. त्यामुळे हायकोर्टाने सौनिक यांच्या विरोधात काढलेल्या जामीनपात्र वॉरंटला स्थगिती दिली.
पुरस्कार विजेत्या शिक्षकांना दुहेरी वेतनवाढ देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्याबद्दल राम शेटे आणि अनिल पालांडे यांच्यासह काही शिक्षकांनी सौनिक यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केल्या होत्या. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सौनिक यांनी एका कनिष्ठ अधिकाऱयाला माफीनामा सादर करण्यास सांगितले. न्यायालयाची नोटीस घेण्यासही टाळाटाळ केली होती.































































