
मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवून लोकशाहीचा आणि खऱ्या मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी आज सर्वपक्षीय महामोर्चा मुंबईत निघणार आहे. असत्याविरोधात सत्याचा आवाजच यावेळी घुमणार असून या धडक मोर्चाला लाखोंची गर्दी उसळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस तसेच डाव्या पक्षांचे वरिष्ठ नेते या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.
-
- मुख्यमंत्री म्हणाले की विरोधकांनी कोणत्या मतदारसंघात लाभ घेतले त्याचा पर्दाफाश करेन. मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतोय की तुम्ही आमचा पर्दाफाश करा. पण जेव्हा मुख्यमंत्री असं म्हणतायत तेव्हा मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलंय की मतचोरी होतेय. –
- मतचोरी करणाऱ्यांना सांगतोय आज फक्त ठिणगी बघताय, तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगी आहे. – उद्धव ठाकरे
- माझ्या आठवणीप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर सर्व राजकीय पक्षांची एकजूट पहिल्यांदाच झालेली असेल. ही विरोधी पक्षांची नव्हे तर लोकशाही आणि लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांची एकजूट आहे
- संयुक्त महाराष्ट्रानंतर पहिल्यांदाच सर्व राजकीय पक्षांची एकजूट झालीय – उद्धव ठाकरे
- मतचोरी करणाऱ्यांना सांगतोय आज फक्त ठिणगी बघताय, तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगी आहे. – उद्धव ठाकरे
- कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडीमधल्या 4500 मतदारांनी मतदार आहेत मुंबईच्या मलबार हिलमधील मतदारसंघातही मतदान केलेले आहे.
- सगळेच जर दुबार मतदारांबाबत बोलत आहेत मग निवडणूका घेण्याची घाई का? लपून छपून चालू आहे ते कशाससाठी? – राज ठाकरे
- आम्ही बोलतोय, उद्धव ठाकरे, शरद पवार बोलतायत, शेकापंचे लोकं बोलताय, भाजपचे, शिंदेंचे, अजित पवारांचे लोकं बोलतायत की दुबार मतदार आहेत.
- आज सर्वजण खूप लांबून आलेला आहात त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.
- आजचा मोर्चा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे – राज ठाकरे
- राज ठाकरे यांच्या संबोधनाला सुरुवात
- संगमनेर मतदारसंघातील ग्रामीण भागात साडे नऊ हजार बोगस मतदार आहेत. आम्ही हरकत घेऊनही हे दुरुस्त करण्याचा अधिकार नाही असे उत्तर तहसीलदारांनी दिली. याचा अर्थ विधानसभेची मतदार यादी कोणत्याही दुरुस्तीशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वापरली जाणार. ही बोगस मतदार यादी दुरुस्त झाली पाहिजे हा आग्रह असून त्यासाठी हा मोर्चा आहे – बाळासाहेब थोरात, काँग्रेस नेते
- ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयोगाची इज्जत काढून टाकली आहे. भाजपची एक शाखा असल्यासारखे आयोग वागतंय. सार्वजनिक संडासात मतदारांची नोंद केली आहे. – कॉ. मिलिंद रानडे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चास्थळी दाखल
- सर्वपक्षीय नेते मोर्चास्थळी दाखल, मतचोरीविरोधातील मोर्चाला उसळला जनसागर
सर्वपक्षीय नेते मोर्चास्थळी दाखल, मतचोरीविरोधातील मोर्चाला उसळला जनसागर pic.twitter.com/QAVAPsNgAy
— Saamana Online (@SaamanaOnline) November 1, 2025
-
- मतचोरीच्या राक्षसाविरोधात डोळे उघडा, अनोख्या पेहरावातून सत्याचा मोर्चामधून दिला मोलाचा संदेश
मतचोरीच्या राक्षसाविरोधात डोळे उघडा, अनोख्या पेहरावातून सत्याचा मोर्चामधून दिला मोलाचा संदेश pic.twitter.com/C08u1B7E0V
— Saamana Online (@SaamanaOnline) November 1, 2025
-
- मतचोरीविरोधात सत्याचा महामोर्चा! मोर्चामध्ये डावे पक्ष सहभागी
मतचोरीविरोधात सत्याचा महामोर्चा! मोर्चामध्ये डावे पक्ष सहभागी pic.twitter.com/U2LHiPpuxV
— Saamana Online (@SaamanaOnline) November 1, 2025
-
- ठाण्याचे 79 वर्षीय ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम आमरुजकर हे मोर्चासाठी आले आहेत. गेल्या 55 वर्षापासून ते शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्यात, आंदोलनात ते हजेरी लावतात.
ठाण्याचे 79 वर्षीय ज्येष्ठ शिवसैनिक तुकाराम आमरुजकर हे मोर्चासाठी आले आहेत. गेल्या 55 वर्षापासून ते शिवसेनेच्या प्रत्येक मेळाव्यात, आंदोलनात ते हजेरी लावतात. pic.twitter.com/E6Rq0oF8ID
— Saamana Online (@SaamanaOnline) November 1, 2025
-
- घाटकोपर पश्चिम येथून आलेल्या राजेश सावंत या मनसेच्या सैनिकाने हातात फलक घेऊन ‘चले जाव भाजप’ असे नारे दिले. तुमच्यात हिंमत असेल तर ECM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
घाटकोपर पश्चिम येथून आलेल्या राजेश सावंत या मनसेच्या सैनिकाने हातात फलक घेऊन ‘चले जाव भाजप’ असे नारे दिले. तुमच्यात हिंमत असेल तर ECM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असे आवाहन त्यांनी केले. pic.twitter.com/3GikC264xr
— Saamana Online (@SaamanaOnline) November 1, 2025
-
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अनिल देसाई, मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांनी सभास्थळाचा आढावा घेतला
मतचोरीविरोधात सत्याचा महामोर्चा! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अनिल देसाई, मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर यांनी सभास्थळाचा आढावा घेतला pic.twitter.com/IHw0yIrqfL
— Saamana Online (@SaamanaOnline) November 1, 2025
-
-
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोर्चासाठी रवाना
- अहिल्यानगर येथून मोर्चासाठी आलेला मुस्लिम तरुण अजिज मोमिन याच्या बॅनरने वेधले लक्ष
-
मतचोरीविरोधात सत्याचा महामोर्चा! अहिल्यानगर येथून मोर्चासाठी आलेला मुस्लिम तरुण अजिज मोमिन याच्या बॅनरने वेधले लक्ष pic.twitter.com/ccfBP93qye
— Saamana Online (@SaamanaOnline) November 1, 2025
-
-
- छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात निवडणूक आयोग, भाजपा विरोधात सत्याचा मोर्चेकरांची जोरदार घोषणाबाजी
-
छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात निवडणूक आयोग, भाजपा विरोधात सत्याचा मोर्चेकरांची जोरदार घोषणाबाजी pic.twitter.com/duJzJkTU5E
— Saamana Online (@SaamanaOnline) November 1, 2025
-
-
- शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे आणि मनसे नेते, ठाणे-पालघरचे विभागप्रमुख अविनाश जाधव मोर्चासाठी रवाना
- चर्चगेट रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात
-
मतचोरीविरोधात सत्याचा महामोर्चा! चर्चगेट रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात pic.twitter.com/6s269vkozI
— Saamana Online (@SaamanaOnline) November 1, 2025
-
-
- महापालिका मार्ग महाविकास आघाडी व मनसेच्या झेंड्यांनी फुलला
-
मतचोरीविरोधात धडकणार सत्याचा महामोर्चा! महानगरपालिका परिसरात लावण्यात आले सर्वपक्षीय झेंडे pic.twitter.com/oRU7ThX62P
— Saamana Online (@SaamanaOnline) November 1, 2025
-
-
- राज ठाकरे यांचा दादर ते चर्चगेट लोकलने प्रवास
-

-
-
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे मोर्चासाठी रवाना
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सत्याच्या मोर्चासाठी रवाना, दादर ते चर्चगेट लोकलने प्रवास #RajThackeray pic.twitter.com/XmitL88hrY
— Saamana Online (@SaamanaOnline) November 1, 2025
-
-
- रस्त्याच्या दुतर्फा शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे झेंडे फडकले
- चर्चगेट परिसरात मोर्चाची जय्यत तयारी
-
मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळाबद्दल निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवून लोकशाहीचा आणि खऱ्या मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी आज सर्वपक्षीय महामोर्चा मुंबईत निघणार आहे. pic.twitter.com/WqQvKnSiid
— Saamana Online (@SaamanaOnline) November 1, 2025
-
-
- थोड्याच वेळात निवडणूक आयोगावर धडकणार मोर्चा
-
मोर्चाला येणाऱ्यांसाठी सूचना
-
- पूर्व उपनगरातून वाहनाने वा मध्य रेल्वेने येणाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून उतरल्यानंतर रस्ता पार करून आराम हॉटेल (कॅपिटल सिनेमा) शेजारील रस्त्याने आझाद मैदान आणि मुंबई (बॉम्बे) जिमखाना दरम्यानच्या पायवाटेने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे.
- नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली येथून येणाऱ्यांनी वरीलप्रमाणे अथवा जर फ्री वेने आलात तर पी. डिमेलो रोड ने जीपीओजवळ उतरून चालत वरील मार्गाने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे.
- पश्चिम उपनगरातून येणाऱ्यांनी चर्चगेट स्टेशनवर उतरावे, आयकर भवनच्या (सरस्वती रोड, महात्मा गांधी रोड) गल्लीतून मुंबई (बॉम्बे) रुग्णालयाच्या रस्त्याने चालत फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे. अथवा पुढे चर्चगेट स्थानकासमोरील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयासमोरील सिग्नलकडून डाव्या बाजूला वळून हुतात्मा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याने फॅशन स्ट्रीटवर पोहोचावे.
- पश्चिम उपनगरातून मेट्रोने येणाऱ्यांनी हुतात्मा चौक स्थानकावर उतरावे. तेथून फॅशन स्ट्रीटवर यावे.




























































