
1. मुंबईसारख्या शहरात बऱ्याच लोकांच्या घरात वायफाय आहे, परंतु कधी कधी वायफायचा स्पीड अचानक कमी झाला असे वाटते. अशावेळी काय कराल…
2. सर्वात आधी राऊटर घराच्या मध्यभागी आणि थोड्या उंचीवर ठेवा, जेणेकरून सिग्नल सर्वत्र पोहोचेल. भिंती, धातूच्या वस्तू, फर्निचर यांसारख्या अडथळ्यांपासून राऊटरला दूर ठेवा.
3. तुमच्या राऊटर आणि मोडेमचा पॉवर केबल काढून टाका, काही मिनिटे थांबा आणि परत कनेक्ट करा. राऊटरची फर्मवेयर अपडेट असल्याची एकदा खात्री करून घ्या.
4. एका वेळी अनेक डिव्हाइसेस कनेक्ट असल्यास वेग कमी होऊ शकतो. जे डिव्हाइसेस वापरत नाहीत त्यांना डिस्कनेक्ट करा. असे केल्यास वायफायचा स्पीड जास्त वाढतो.
5. तुमच्या कॉम्प्युटरवर खूप जास्त बॅकग्राऊंड प्रोग्राम चालू आहेत का किंवा मालवेअर आहे का ते तपासा. नवीन तंत्रज्ञानाचा राऊटर घेतल्यास स्पीड वाढू शकतो.
            
		





































    
    





















