
तामिळनाडूच्या कोइंम्बतूर विमानताळावर एक धक्कादायक घटना घडली. येथे तीन जणांनी मिळून कॉलेजच्या विद्यार्थीनीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. तामिळनाडू पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी कोइंम्बतूरच्या एका खासगी महाविद्यालयातील विद्यार्थाीनी आहे. रविवारी ती मित्रासोबत कारमध्ये बसली असताना, अचानक काहीजण त्यांच्याजवळ आले. यानंतर त्यांनी तरूणीचे अपहरण करून तिला जबरदस्तीने एका अज्ञातस्थळी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान अथक प्रयत्नांनंतर मंगळवारी पोलिसांना आरोपींचा शोध लावला. यावेळी पोलीस आणि आरोपींमध्ये झटापट झाली. पोलिसांनी आरोपींच्या पायंवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना अटक करत उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील चौकशी सुरू आहे.
            
		





































    
    




















