दाऊदच्या खेडमधील जागेचा व्यवहार रद्द

कुख्यात दाऊद इब्राहिम याची मुंबईतील तसेच खेडमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी लिलाव पुकारण्यात आला होता. मात्र त्या मालमत्ता खरेदी करण्यासाठी कोणीही फिरकले नाही. त्यामुळे या मालमत्तांचा भविष्यात पुन्हा लिलाव करू असे सफेमा कार्यालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

खेड तालुक्यातील मुंबके या गावातील दाऊदची वडिलोपार्जित शेतजमीन तस्कर आणि परकीय चलन (मालमत्ता जप्त) कायदा (सफेमा) आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत सक्षम प्राधिकरणाच्या कार्यालयाने विक्रीसाठी ठेवलेल्या नऊ मालमत्तांपैकी एक होती. हा लिलाव सक्षम अधिकारी सुरभी शर्मा यांच्या देखरेखीखाली पार पडला, परंतु बोली लावणारा कोणी पुढे आलाच नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सफेमा अधिकाऱ्यांच्या मते, खेड-मुंबके येथील चार भूखंड दाऊदची आई अमिनाबी यांच्या मालकीचे होते. हाताळणीनंतर ते हसीना पारकरला हस्तांतरित केले. त्यापैकी या मालमत्ता 5 जानेवारी 2024 रोजी लिलाव करण्यात आल्या, ज्यामध्ये दोन मालमत्ता या 1730 चौरस मीटरचा भूखंड होता. त्या राखीव किमतीला 1.56 कोटीला विकल्या गेल्या आणि 171 चौरस मीटरचा भूखंड, ज्याची किंमत 15,440 रुपये एवढी होती.

दिल्लीस्थित एक वकील अजय श्रीवास्तव यांनी पहिल्या भूखंडासाठी 3.28 लाख रुपये आणि छोटय़ा भूखंडासाठी 2.01 कोटी रुपये अशी त्याची राखीव किमतीच्या 1300 पट जास्त बोली लावली होती. नंतर श्रीवास्तव यांनी जास्त बोली आहे म्हणून लहान भूखंडाची विक्री रद्द केली, पण 10,420 चौरस मीटर (9.4 लाख रुपये राखीव) आणि 8953 चौरस मीटर (8 लाख रुपये राखीव) असलेले दोन मोठे भूखंड विक्रीला राहिले नाहीत.