पाकिस्तानात GenZ रस्त्यावर; सरकारविरोधात जोरदार आंदोलन

नेपाळ आणि बांगलादेशनंतर आता पाकव्याप्त कश्मीरमध्ये GenZ रस्त्यावर उतरली आहे. शिक्षणाशी संबंधित मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी सरकारविरुद्ध आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात जोरदार नारेबाजी केली. शिवाय पोलिसांच्या काही वाहनांची तोडफोडही केली. या आंदोलनाला 4 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली होती.

भरमसाट शुल्कवाढीला विरोध करणाऱया विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला होता. त्यात एक विद्यार्थी गोळी लागल्यामुळे जखमी झाला होता. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. सेमिस्टर शुल्कात लाखो रुपयांची वाढ केल्यामुळे विद्यार्थी नाराज आहेत. याशिवाय ई-मार्किंग पद्धतीलादेखील विद्यार्थी विरोध करीत आहेत. यापूर्वी नेपाळ आणि बांगलादेशमध्ये GenZने केलेले आंदोलन सरकारने उलथून लावले होते. आता पाकिस्तानात ही पिढी रस्त्यावर उतरत आहे.