
प्रसिद्ध इंटेरियर डिझायनर जरीन खान यांचे शुक्रवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. जुहू येथील स्मशानभूमीत हिंदू रितीरिवाजानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जरीन यांच्या पश्चात पती, ज्येष्ठ अभिनेते संजय खान आणि सुझान खान, सिमोन अरोरा, फराह अली खान आणि झायेद खान ही चार मुले आहेत.
जरीन यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हृतिक रोशन, जया बच्चन, शबाना आझमी, बॉबी देओल, पूनम ढिल्लों, जॅकी श्रॉफ, रकुल प्रीत सिंह, जॅकी भगनानी आदी कलाकारांनी हजेरी लावली.



























































