भव्य आगरी वधू-वर मेळावा

आगरी समाज विकास संघ, मुंबईच्या वतीने 64 व्या भव्य आगरी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा उद्या, रविवारी सकाळी 10 वाजता बालाजी बँक्वेट हॉल, सेक्टर–10, वाशी येथे होणार आहे. उमेदवार नवीन असेल तर त्याने तीन बाय चार आकाराचे दोन फोटो सोबत आणावे, उमेदवाराची जुनी नोंद असेल तर संस्थेने दिलेली नोंदवही घेऊन यावी. इच्छुक वधू-वरांनी या मेळाव्यास मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क – 9869007754, 9773529747.