
यंदाचा शिरीष पै जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध कवयित्री व स्त्रीरोगतज्ञ डॉ. वृषाली किन्हाळकर यांना जाहीर झाला आहे. माजी न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या हस्ते 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता दादरच्या वनिता समाज हॉलमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे असतील. ज्येष्ठ विधीज्ञ राजेंद्र पै हेही यावेळी उपस्थित राहतील.

























































