तो चांगला नवरा नाही…गोविंदाच्या बायकोने केली पोलखोल, सांगितली आतली गोष्ट

अभिनेता गोविंदा अलिकडे त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा त्याच्या घटस्फोटाच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. त्यावर दोघांनी विराम लावला आहे. अशातच सुनिता आहुजा यांनी पुन्हा एकदा त्यांच्या वैवाहीक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. गोविंदा एक चांगला पती नसून पुढच्या जन्मी असा नवराच नको असे त्या मुलाखतीत म्हटले आहे. सुनीता आहुजा यांनी पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत बेधडकपणे व्यक्त झाली आहे.

सुनिता मुलाखतीत म्हणाल्या, तरुणपणी कोणत्या गोष्टींची जाणीव झाली नाही. पण 38 वर्षांच्या संसारानंतर आता मी चांगलीच समजूतदार झाले आहे. बायकोपेक्षा तो अभिनेत्रींसोबत वेळ घालवतो. एखाद्या कलाकाराची बायको होण्यासाठी आपल्याला फार मजबूत राहावं लागतं. दगडासारखे काळीज ठेवावे लागते हे मला समजायला 38 वर्षे लागली. सुनीताला विचारण्यात आले की, पुढच्या जन्मी गोविंदा पुन्हा नवरा बनलेला चालेल का तेव्हा ती म्हणाली अजिबात नाही. मी आधीच बोलले होते. गोविंदा एक चांगला मुलगा आहे, चांगला भाऊ आहे मात्र चांगला नवरा बनू शकला नाही. पुढच्या जन्मात माझा मुलगा म्हणून येऊदे पण पती म्हणून नको. सात जन्म विसरुन जा या जन्मात दिला तेवढा पुरे असे ती म्हणाली. पुढे म्हणाली तारुण्यात असताना काही चुका होतात हे मान्य आहे. त्यांनीच काय माझ्याकडूनही बऱ्याच चुका झाल्या आहेत. मात्र वय झाल्यानंतर अशा चुका करु नये ज्या आपल्याला शोभणार नाहीत. विशेष म्हणजे जेव्हा तुमचे सुखी कुटुंब असतं. बायको, दोन मुल असताना अशा चुका करणे शोभत नाही.

गोविंदा आणि सुनिताचे लग्न 1987 साली झाले होते. गोविंदाने आपली मुलगी टीना आहुजाच्या जन्मापर्यंत आपले लग्न लपवले होते. 1989 मध्ये टीनाचा जन्म झाला तर 1997मध्ये यशवर्धनचा जन्म झाला.