
सध्याचा जमाना एआयचा आहे. बडय़ा कंपन्या एआयवर काम करत आहेत. या कंपन्या आपली एआय टीम मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशातच मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी 28 वर्षीय अलेक्झांडर वांगची नियुक्ती करत त्याच्या हाती मेटाच्या सुपरइंटेलिजेंस लॅब्सचे नेतृत्व दिले आहे. यासाठी मेटाने तब्बल 14.3 अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. कामवांगचा जन्म न्यू मेक्सिकोमध्ये झाला. त्याचे पालक चीनमधून अमेरिकेत आले होते. अलेक्झांडर वांगला लहानपणापासूनच गणित आणि संगणक शास्त्राची आवड होती. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजीला प्रवेश घेतल्यानंतर त्याने 2016 साली स्केल एआयची स्थापना केली होती. ही पंपनी लाँच करण्यासाठी वांगने शिक्षण अर्धवट सोडले होते. अल्पावधीतच स्केल एआयने मोठय़ा एआय डेव्हलपर्स पंपन्यांशी भागीदारी करण्यात यश मिळवले. एनविडीया, अॅमेझॉन आणि मेटा अशा कंपन्या त्याच्या क्लाइंट आहेत. 2024 मध्ये म्हणजे स्थापनेनंतर आठ वर्षांत कंपनीचे मूल्य 14 अब्ज डॉलर्सवर पोहोचले. यामुळे एआय क्षेत्रातील सर्वात कमी वयाचा अब्जाधीश म्हणून वांगची ओळख निर्माण झाली.




























































