
दिल्लीतील दहशतवादी स्फोट प्रकरणात काँग्रेस पक्षाने सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर तब्बल 50 तासांनी मोदी सरकारने अखेर हे दहशतवादी हल्ला असल्याचे मान्य केले. पण, पाकिस्तानबद्दल एक चकार शब्दही उच्चारला नाही. पाकिस्तानचा सहभाग नसताना भारतात दहशतवादी हल्ला होऊ शकतो का? असा सवालही सुप्रिया श्रीनेत यांनी उपस्थित केला.
सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने सांगितले होते की कोणताही दहशतवादी हल्ला हा युद्धाची कारवाई मानली जाईल. पण पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधिततेचे पुरावे असूनही सरकारची आतापर्यंतची भूमिका त्या वचनाच्या अगदी उलट आहे.
तसेच नरेंद्र मोदी यांनी त्या वेळी केवळ बडबड आणि स्वतःची प्रतिमा चमकवण्यासाठी भारताच्या सुरक्षेचा भयंकर विनोद केला होता का? आणि आता ते स्वतःच त्यांच्या विधानांच्या जाळ्यात अडकले आहेत का? काहीही असो, मोदींची अज्ञानता आणि अहंकार भारतासाठी अत्यंत महागात पडत आहे.
सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, या एका प्रश्नाचे उत्तर संपूर्ण देश जाणून घेऊ इच्छितो की, या दहशतवादी हल्ल्याबाबत कोणतीही गुप्तचर माहिती का नव्हती? आयबी, दिल्ली पोलिस आणि अमित शाह काय करत होते? त्यांनी म्हटले की, एक गोष्ट वारंवार सिद्ध होत आहे की हा देश अजिबात सुरक्षित हातांमध्ये नाही असेही श्रीनेत म्हणाल्या.
दिल्ली बम धमाकों के 50 घंटे बाद मोदी सरकार ने आख़िर स्वीकार किया कि यह एक ‘आतंकवादी हमला’ था
लेकिन पाकिस्तान पर एक शब्द नहीं बोला
क्या पाकिस्तान के बिना भारत में कोई आतंकवादी हमला हो सकता है?
पहलगाम आतंकी हमले के बाद मोदी सरकार ने कहा था कि किसी भी आतंकवादी हमले को युद्ध की… pic.twitter.com/myRaNPMxNx
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) November 13, 2025


























































