
आघाडीही दुचाकी उत्पादक कंपनी इंडिया यामाहा मोटर (आयवायएम) प्रा. लि.ने देशात आपली नवीन XSR155 सादर केली आहे. मुंबईत एका इव्हेंटमध्ये कंपनीने आपले चार उत्पादक सादर केले आहेत. यामध्ये XSR155 या निओ-रेट्रो रोडस्टरसह EC-06 स्कूटर, AEROX-E, FZ-RAVE हे नवीन मॉडेल सादर केले आहेत. यातच कंपनीची नवीन XSR155 बाईकबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
यामाहाने आपल्या नवीन बैउकची किंमत XSR155 1,49,990 (एक्स-शोरूम-दिल्ली) इतकी ठेवली आहे. यामाहाच्या १५५ सीसी लाइनअपमधील हे नवीन मॉडेल रेट्रो डिझाइन आणि आधुनिक इंजिनिअरिंगला एकत्र आणतं. XSR155 मध्ये १५५ सीसी लिक्विड-कूल्ड, ४-व्हॉल्व्ह इंजिनच्या पॉवरसह व्हेरिएबल व्हॉल्व्ह अॅक्च्युएशन (व्हीव्हीए) आहे, जे १३.५ केडब्ल्यू पॉवर आणि १४.२ एनएम टॉर्क जनरते करते.
यामाहाच्या प्रमाणित डेल्टाबॉक्स फ्रेमवर डिझाइन करण्यात आलेल्या या मोटरसायकलमध्ये अॅल्युमिनिअम स्विंग आर्म, अपसाइड-डाऊन फ्रण्ट फोर्क्स, लिंक्ड-टाइप मोनोक्रॉस रिअर सस्पेंशन आणि ६-स्पीड ट्रान्समिशनसोबत असिस्ट व स्लिपर क्लच आहे. तसेच XSR155 मध्ये ड्युअल-चॅनेल एबीएस व ट्रॅक्शन कंट्रोल देखील आहे, ज्यामधून ग्राहाकंना सुरक्षित राइडची खात्री मिळते, असं कंपनीचं म्हणणं आहे.
TVS Ronin शी होणार स्पर्धा
Yamaha XSR 155 ची देशात TVS Ronin शी स्पर्धा होईल, असं बोललं जात आहे. TVS Ronin मध्ये २२५.९ सीसी, ऑइल-कूल्ड इंजिन आहे. जे २०.४ पीएस पॉवर आणि १९.९३ एनएम टॉर्क जनरते करते. याशिवाय TVS Ronin मध्ये ५-स्पीड गिअरबॉक्स आहे, जो शहरातील ट्रॅफिक राइडिंगसाठी अधिक चांगल्या प्रकारे ट्यून केलेलं आहे. याची किंमत १.२४ लाख ते १.५९ लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे.




























































