
अमली पदार्थविरोधी पथकाने पकडलेल्या ताहीर सलीम डोला याच्या चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. देशविदेशात त्याने अनेक पार्ट्यांचे आयोजन केले असून त्यात त्याने ड्रग्जचा पुरवठा केल्याचे निष्पन्न झाले आहे. गंभीर म्हणजे बॉलीवूड कलावंतांसह त्याने पार्ट्या केल्याचे व त्वरित स्वतः सहभागी होऊन ड्रग्जचा उपलब्ध करून दिल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे. ताहीर डोला याला अमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने अटक केली असून त्याची पोलीस कोठडीची मुदत आज संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

























































