एकाही व्यक्तीने भाजपला मत दिलं नाही तरी ते निवडणूका जिंकतील, अभिनेत्याचा जोरदार टोला

बिहारच्या विधानसभा निवडणूकीचा निकालात सध्या भाजप व जदयू आघाडीवर असल्याचे दिसत आहे. तर राजद व काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रीय जनता दलाच्या जागांमध्ये तर मागच्या निवडणूकीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सध्या या निकालावरून देशभरातील विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

वादग्रस्त अभिनेता कमाल आर खानने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत भाजपला व निवडणूक आयोगाला टोला. ”मी आधी म्हटल्याप्रमाणे आज भाजपने बिहार जिंकले. मी आज पुन्हा सांगतो की पुढचे 50 वर्ष भाजपचीच सत्ता येणार. उत्तर प्रदेशात तर भाजपला एकाही व्यक्तीने मत दिलं नाही तरी देखील भाजप जिंकेल. निवडणूक आयोग हे हाताबाहेर गेले आहे”, असा टोला कमाल आर खानने लगावला आहे.

”सध्या निवडणूक आयोग एवढे जबरदस्त काम करतेय की भाजपने निवडणूक लढवली नाही तरी ते जिंकतील”, असाही टोला केआरकेने लगावला.