आयफोनंतर सॅमसंगचा फोनही ऑरेंज रंगात येणार!

अॅपल कंपनीने आयफोन 17 प्रो मॉडल्सला कॉस्मिक ऑरेंज रंगात आणले. हा रंग अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. या रंगाच्या पह्नला सर्वात जास्त मागणी आहे. आयफोननंतर आता सॅमसंग कंपनीही आपल्या नव्या फोनला कॉस्मिक ऑरेंज रंगात आणणार आहे, अशी चर्चा आहे. सॅमसंगच्या गॅलेक्स एस 26 सीरिजची सध्या जोरदार चर्चा आहे. सॅमसंग गॅलेक्स एस 26 प्लस हा फोन या रंगात आणला जाऊ शकतो, असे लीक रिपोर्टमधून समोर आले आहे. या फोनमध्ये 6.7 इंच क्वॉड एचडी प्लस रिझॉनल्यूशनचा डायनामिक अमोलेड 2 एक्स डिस्प्ले मिळू शकतो. फोनमध्ये स्नॅपड्रगन 8 एलाइट जनरेशन किंवा एक्सिनॉस 2600 प्रोसेसर, 12 जीबीपर्यंत रॅम, ट्रिपल कॅमेरा सेटअप, 50 मेगापिक्सल प्रायमरी पॅमेरा, 12 मेगापिक्सल वाइड कॅमेरा आणि 3 एक्स ऑप्टिकल झूमचा 12 मेगापिक्सलचा टेलिपह्टो लेन्स दिले जाऊ शकते. सॅमसंगच्या गॅलेक्स एस सीरिजमधील फोन हे झूम कॅमेऱ्यासाठी म्हणून ओळखले जातात.