
हिंदुस्थानी हवाई दलाचं पीसी-७ पिलाटस बेसिक ट्रेनर विमान शुक्रवारी चेन्नईतील तांबरमजवळ नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान कोसळलं. सुदैवाने वैमानिक वेळेवर सुरक्षितपणे बाहेर पडला, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती देत हवाई दलाने सांगितलं की, हे उड्डाण नियमित प्रशिक्षण मोहिमेचा भाग होतं. अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी (तपास समिती) स्थापन करण्यात आली आहे आणि ती सविस्तर चौकशी करेल. मदत आणि सुरक्षा पथके तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली. स्थानिक प्रशासनानेही हवाई दलाला मदत केली. अपघातानंतर हवाई दलाने सांगितलं की उड्डाण सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल.


























































