चीनचे अडकलेले अंतराळवीर परतणार

अंतराळात गेल्यानंतर त्या ठिकाणी अडकलेले चीनचे तीन अंतराळवीर लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. चेन डोंग, चेन झोंगरूई आणि वांग जी अशा या तीन अंतराळवीरांची नावे आहेत. हे अंतराळवीर एप्रिलमध्ये तियांगोंग अंतराळ स्टेशनला गेले होते. तेथे ते अंतराळ स्टेशनवर सहा महिन्यांसाठी गेले होते. 1 नोव्हेंबरला नवीन दल पोहोचल्यानंतर चार दिवसांनंतर पृथ्वीवर परतणार होते, परंतु, अंतराळवीरांच्या शेनझोउ-20 अंतराळ यानाला एका तुकडय़ाचा धक्का लागल्याने त्यांचा पृथ्वीवर येण्याचा प्रवास पुढे ढकलण्यात आला होता, परंतु आता शेनझोउ-21 यान अंतराळवीरांना घेऊन परत येत आहे.