भायखळ्यात इमारतीच्या पायाभरणी दरम्यान अपघात, दोन मजुरांचा मृत्यू

भायखळ्यातून एक दुर्देवी घटना घडली आहे. भायखळा येथील हबीब मेन्शन येथे इमारतीच्या पायाभरणी दरम्यान झालेल्या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर तीन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नायर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.

भायखळा हबीब मॅन्शन येथे कन्स्ट्रक्शनचे काम सुरु आहे.. इमारतीच्या पायाभरणीदरम्यान माती आणि चिखलाचा ढिग होता त्या ढीगाऱ्याखाली दबल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला. तीन जण जखमी झाले त्यांच्यावर नायर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. सव्वा तीन दरम्यान ही घटना घडली आहे.