भीमराव पांचाळे यांना ‘मृद्गंध जीवनगौरव’

लोकशाहीर विठ्ठल उमप फाउंडेशनचा ‘मृद्गंध जीवनगौरव 2025’ पुरस्कार ज्येष्ठ गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला. पुरस्कार वितरण सोहळा येत्या 26 नोव्हेंबर रोजी रवींद्र नाटय़मंदिर येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे.

विठ्ठल उमप यांच्या 15व्या स्मृतिदिनानिमित्त लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व मृद्गंध पुरस्कारांची घोषणा आज शाहीर नंदेश उमप यांनी केली. शाहीर राजेंद्र राऊत , शिल्पकार प्रदीप शिंदे, अभिनेता जयवंत वाडकर, दिग्दर्शक परेश मोकाशी, अभिनेत्री- निर्माती मधुगंधा कुलकर्णी, अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची ‘मृद्गंध’ पुरस्कारासाठी निवड झाल्याने नंदेश उमप यांनी सांगितले. सोहळ्या दरम्यान विविध क्षेत्रांतील कलावंत आपल्या सादरीकरणातून विठ्ठल उमप यांना सांगीतिक मानवंदना देणार आहेत.