गोरेगावमधील महाराष्ट्र विद्यालयात ‘चिल्ड्रन्स डे’ उत्साहात; अभिनय, नृत्याचे विद्यार्थ्यांकडून शानदार सादरीकरण

गोरेगाव पश्चिमेकडील नूतन विद्यामंदिर संचालित महाराष्ट्र विद्यालयात गजानन एज्युकेशन ट्रस्टतर्फे दहावीच्या आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा ‘चिल्ड्रन्स डे’ मोठय़ा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी भजन, गाणी, अभिनय, नृत्य सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.

शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मार्गदर्शक आणि शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी बँड संचालनाने त्यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र विद्यालयातील दहावी, ज्युनिअर कॉलेज कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना गजानन एज्युकेशनचे संचालक विजय सिंग आणि सुभाष देसाई यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे सचिव अनिल देसाई, सल्लागार मुरलीधर मोरे, रितेश झारू, मुख्याध्यापक विष्णू मसुरकर, मुख्याध्यापिका पूर्वा नाईक, सदस्य महेश करमरकर, प्रतिभा तारपटला, प्रियांका जाधव, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुप्रसिद्ध नकलाकार आणि गायक संजय शर्मा तसेच त्याचे चिरंजीव जादूगार जय वर्मा यांच्या परफॉर्मन्सने उपस्थितांचे मनोरंजन केले.