
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर रोज नवीन ट्रेंड पाहायला मिळतो. कधी एखादा व्हिडीओ ट्रेंडमध्ये येतो तर कधी एखादी छोटीसी रील प्रचंड भाव खाऊन जाते. सध्या इन्स्टावर एका मराठी गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या गाण्याला इन्स्टावरील यूजर्संकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याचे बोल पुढीलप्रमाणे आहेत. हळदी कुंकानं रिंगण भरा ग… पांजणी या पूजा जानूची करा गं… लिंबाला टाचण्या टोचून… चौकटीला बाहुली खोचून… केली काळी जादू, अन् दुरावा आलाय… कुण्या सटवीनं जादूटोना केला, माझा जानू आज दुसरीचा झाला…असे आहेत. या गाण्यावर इन्स्टावरील अनेक तरुणी रील बनवत आहेत. प्रत्येक रीलला हजारो ह्यूज, लाइक आणि शेअर्स मिळत आहेत. इन्स्टाग्रामसोबत यूटय़ूबवरही या गाण्याला पसंती मिळत आहे.



























































