राष्ट्रवाद धोकादायक आहे – मोहन भागवत

राष्ट्रवाद धोकादायक आहे. त्याच्यामुळे जगात युद्धे झाली त्यातूनच आंतरराष्ट्रीयवाद पुढे आला. मात्र, त्यामुळे आज सर्वाधिक संघर्ष हा शक्तिशाली देशांमध्ये दिसून येतो आणि त्याचे परिणाम दुबळ्या देशांना भोगावे लागतात, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. देशाला ‘विश्व गुरू’ बनविणे कोण्या एका व्यक्तीच्या हातात नाही, असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले.

ते पं. दीनदयाल स्मृति व्याख्यानात बोलत होते. भागवत म्हणाले की, ज्यांनी आंतरराष्ट्रीयवाद पुढे आणला, ते स्वतःच्या देशाच्या हितांना प्राधान्य देतात. त्यामुळे जागतिक प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आज जग हिंदुस्थानकडे पाहत आहे. जग दर 15 वर्षांनी विचार बदलते. मात्र, हिंदुस्थानचे तसे नाही, असेही भागवत म्हणाले. जगातील केवळ 4 टक्के लोकसंख्या 80 टक्के उपलब्ध साधनांचा वापर करते. त्यामुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी वाढतच आहे, असेही ते म्हणाले.