
पुण्यात सध्या गुलाबी थंडीला सुरुवात झाली आहे. कपाटात ठेवलेले स्वेटर, कानटोप्या लोकांनी बाहेर काढले असून अनेक ठिकाणी शेकोटी देखील पेटवलेल्या दिसत आहेत. गणपत्ती बाप्पाला देखील थंडी वाजत असेल ही गोड भावना ठेवून सारसबागेतील मंदिरातल्या गणपती बाप्पाला स्वेटर व कानटोपी घालण्यात आली आहे.

























































