जोधपूर विमानतळाजवळील नेहरु कॉलनीत नातेसंबंधांना काळिमा फासणारी घटना घडली आहे. वडिलांच्या संपत्तीसाठी चार मावश्यांनी अवघ्या बावीस दिवसांच्या बाळाची हत्या केली.
ही घटना शनिवारी सकाळी साडेतीन ते चार दरम्यान घडली. नवजात बाळ सुमनच्या शेजारी झोपले होते. त्याचदरम्यान मंजू, गीता, ममता आणि रामेश्वरी या चार मावशींनी बाळाला उचलले आणि तेथून दूर नेले. असा आरोप आहे की त्यांनी प्रथम त्याचा गळा दाबून खून केला नंतर वारंवार जमिनीवर आपटले. बाळाचा तात्काळ मृत्यू झाला. घटनेच्या वेळी, बाळाची आई आणि दुसरी एक मावशी खोलीत होत्या. आवाज ऐकून सुमन जागी झाली तेव्हा शेजारी बाळ नव्हते त्यामुळे सुमन घाबरली. तिने दार उघडले आणि बाहेर आली, पण दुसऱ्या खोलीत तिच्या मुलाची अवस्था पाहून ती ओरडली.
पोलीस तपासात असे दिसून आले की चारही आरोपी बहिणींमध्ये संपत्तीवरुन वाद होता, त्यात सुमन आधीच सहा वर्षांच्या मुलाची आई होती आणि आता तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता. यामुळे मंजू, गीता, ममता आणि रामेश्वरी अस्वस्थ झाल्या. दरम्यान, सुमनचा भाऊ जागा झाला आणि त्याने ही घटना पाहिली आणि ती थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी बहिणींनी नकार दिला. भावाने संपूर्ण घटनेचा व्हिडीओ बनवला, जे पोलिसांनी पुरावे म्हणून जप्त केले आहे. बाळाला ताबडतोब महात्मा गांधी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रडत सुमनने तिच्या पतीला फोनवर सांगितले की तिच्या चार बहिणींनी त्यांच्या मुलाची हत्या केली आहे.






















































